रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकर बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
मूळचा सिंगापूरचा समूह असलेल्या डीबीएसने यासाठी २५०० कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकारणामुळे डीबीएस समुहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात सापडल्या लक्ष्मी विलास बँकेवर आज केंद्र सरकारने निर्बंध (Moratorium) घातले आहेत. पुढील ३० दिवसांसाठी हे निर्बंध राहतील