ग्लँड फार्माने आज जोरदार नोंदणी केली. इश्यू प्राईस पेक्षा प्रत्यक्ष कंपनीचा शेअर १७१० रुपयांवर नोंदवला गेला. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून कंपनीला अद्याप एकही नकारात्मक शेरा मिळालेला नाही. एएनडीएकडे सादर केलेल्या २६७ औषधांच्या प्रस्तावांपैकी २१५ औषधांना मान्यता मिळाली आहे.

आयपीओसाठी निश्चित केलेल्या किमतीच्या तुलनेत आज शेअरने तब्बल १४ टक्के अधिक दराने नोंद केली. या आयपीओतील भाग्यवान गुंतवणूकदारांना प्रती शेअर २०१ रुपयांचा फायदा झाला. कंपनीने आयपीओसाठी १,४९० ते १,५०० रुपयांचा किंमतपट्टा निर्धारित केला होता. मात्र प्रत्यक्षात कंपनीचा शेअर १७१० रुपयांवर नोंदवला गेला.

अभिप्राय द्या!