लक्ष्मी विलास बँकेनंतर रिझर्व्ह बँकेनं आणखी एका बँकेवर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेनं या बँकेला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश १७ नोव्हेंबर २०२० ला बँक बंद होण्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला कर्ज देता येणार नाही. याव्यतिरिक्त जुन्या कर्जाचं नुतनीकरण अथवा बँकेला गुंतवणूक करण्यास मनाई असेल.

अभिप्राय द्या!