सोमवारी ‘अ‍ॅम्फी’च्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, समभाग फंडातील ओघ घमी होऊनही म्युच्युअल फंडांची मालमत्ता सार्वकालीन उच्चांकावर पोहोचलेली दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये नियोजित गुंतवणुकीत ९ कोटींची वाढ होऊन गुंतवणूक ७,८०० कोटींवर स्थिरावल्याचे आकडेवारी सांगते. नियोजित गुंतवणुकीच्या नोंदणीत झालेली वाढ वगळता म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेतील वाढ म्युच्युअल फंडात वाढलेल्या ओघामुळे नसून मुखत्त्वे बाजाराच्या भांडवली मूल्यात झालेल्या वाढीमुळे असल्याचा निष्कर्ष विश्लेषकांनी काढला आहे.

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढले असून याचे मुख्यत्वे तीन कारणे आहेत. पहिले कारण सुज्ञ गुंतवणूकदारांना सध्याचे मूल्यांकन अर्थव्यवस्थेच्या वास्तवतेशी फारकत घेणारे वाटते. दुसरे म्हणजे, अनेकांचे रोजगार गेले असून वेतन कपातीमुळेही दैनंदिन खर्चाची जुळवणी करताना बचतीचा आधार घेत आहेत. अन्य गुंतवणुकीसोबत म्युच्युअल फंडातून ते बाहेर पडत आहेत. तिसरे कारण, समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी अपेक्षित परतावा दिलेला नाही. कोणत्याही कारणांनी गुंतवणूकदार गुंतवणुकीतून बाहेर पडले तरी फंड घराण्यांच्या मालमत्तेत आणि नफ्यात वाढ होत आहे. आणि यापाईच तज्ञ सल्लागारच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करणे हिताचे असते !!

अभिप्राय द्या!