म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यात शहरी गुंतवणूकदारांप्रमाणेच आता द्वितीय व तृतीय स्तरांतील किंवा छोट्या शहरांतील गुंतवणूकदारही सक्रिय झालेला दिसत आहे. ऑक्टोबर अखेर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनांतर्गत सरासरी मत्तेमध्ये (एयूएम) या छोट्या शहरांनी २८ लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. एकूण एयूएमच्या ही रक्कम १६ टक्के आहे. या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आला आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडस्ट्री (अॅम्फी) या फंडांच्या मध्यवर्ती संस्थेने दिली आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक फारशी पसंत नसल्याचे दिसून आले आहे. बहुतांश रिटेल गुंतवणूकदार वितरकांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगांच्या एकूण फोलिओंमध्ये रिटेलचा हिस्सा ९० टक्के असला, तरी एकूण संपत्तीमध्ये त्यांचा हिस्सा ५५ टक्के आहे.

अभिप्राय द्या!