गुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे
गेल्या ९ महिने सर्व जग कोरोनामुळे व्यतिथ झाले आहे. यामुळे या कोरोनाने आपल्याला आर्थिक परीस्थितीची जाणीव करून देण्याचे  शिकविले आहे.आपल्याला आर्थिक नियोजनात गरजेपेक्षा जास्त जोखीम कुठे आहे? गुंतवणुकीचा गुंता झाला आहे का? अवाजवी कर्ज आहे का? आपले खर्च आपल्या मिळकतीपेक्षा जास्त आहेत का? यासंबधी विचार करण्यासाठी एक चांगली संधी या  महामारीमुळे आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचमुळे गुंतवणूक करताना योग्य परतावा मिळण्यासाठी कोणती तत्वे अवलंबवावी या संबधातील खालील विवेचन आपण सर्वांनी आचरणात आणावे अशी अपेक्षा आहे.
१.    सक्रीय राहा – सक्रीय राहाणे याचा अर्थ आपला पैसा बचत खात्यात साचू न देता चक्रवाढव्याज मिळवण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या लिकविड(liquid Fund) फंडात गुंतवावा त्यासाठी सक्रीय राहणे होय. आणि गुंतवणूकीपासून योग्यवेळी नियोजन करून आपला परतावा तपासण्याची दक्षता घेणे हे आहे.
२.    पूर्व नियोजन – आपल्या खात्यात कोणत्याही व्यवहारातून पैसा यायच्या आधी त्यातील किती रक्कम कोठे गुंतवावी याचे नियोजन करणे हे महत्वाचे असते.

३.    प्राधान्यक्रम निश्चित करणे – आपल्याला कोणकोणत्या महत्वाच्या गरजासाठी  केव्हा केव्हा पैसा लागणार आहे? व त्या दृष्टीने आपली गुंतवणूक आहे का याचे प्राधान्य ठरवणे हेही महत्वाचे असते.

४.    सुवर्णमध्य काढणे -मुलांचे लग्न,मुलांचे शिक्षण,आपली निवृत्ती व अन्य काही, यासंबधात आपली गुंतवणूक सुवर्णमध्य काढून करणे हिताचे असते.अन्यथा गुंतवणूकीतून परतावा मिळण्यापेक्षा जास्त व्याजाचे कर्ज घेण्यापायी पश्चाताप होऊ शकतो.

५.    तज्ञाचे मार्गदर्शन – गुंतवणूक करताना त्यातून मिळणारा परतावा हा कशा प्रकारचा असेल हे समजत नसेल तर योग्य व तज्ञ व्यक्तीकडे जाणे खूप महत्वाचे असते.आजकाल एखाद्या कंपनीचे एजंट स्वतः गुंतवणूक सल्लागार आहेत अशा प्रकारचे फलक लावतात.पण त्याच्यांकडे त्यासंबंधीचे कोणतेही अधिकृत शिक्षण नसते, हे ओळखून आपण तज्ञ सल्लागार निवडणे हे महत्वाचे आहे.

६.    ज्ञान अद्ययावत  करावे– अर्थ नियोजन करण्याच्या वेगवेगळ्या संस्था म्हटले तर दररोज अनेक बदल करत असतात.यामध्ये केंद्र शासनाचा अर्थ विभाग,महाराष्ट्र शासनाचे अर्थखाते,सेबी,AMFI या संस्था गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी व गुंतवणूकदाराची फसवणूक होवू नये यासंबधात अनेक नियम व  बदल वेळोवेळी करतात. आणि जो तज्ञ मार्गदर्शक आपण निवडतो त्याचे यासंबधांतील ज्ञान अद्ययावत असणे हे खूप महत्वाचे असते.

व्याज दरातील बदल,चक्रवाढ व्याज देण्याच्या पद्धती मुदतीपूर्वी गुंतवणूक काढण्याची झाल्यास त्याच्यासाठी लागणारे दंडव्याज कर्ज घेतले असल्यास त्याचे व्याज मोजण्याची पद्धत यामध्ये या करोनाच्या कालावधीत अनेक बदल गुंतवणूकदारांच्या फायद्याचे केले आहे.यासंबधीचे अद्ययावत ज्ञान नसेल तर आपले अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.

वरील सर्व बाबीचे योग्य अवलोकन करून आपल्या मेहनतीचा पैसा तज्ञ सल्लागारामार्फत योग्य पद्धतीत गुंतवल्यास आपल्याला तसेच आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना केव्हाच आर्थिक चिंता भेडसावणार नाही, याची मला खात्री वाटते,आणि आपल्याला झालेला फायदा हा आपल्या पिढीपुरता मर्यादित न राहता आपल्या पुढच्या पिढीला सुध्दा उपयुक्त होऊ शकतो हे आपण ध्यानात घ्यावे.
आणि यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन “ धनलाभच्या ”  वाचकांना करण्यात येतआहे.

अभिप्राय द्या!