मिरे असेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडिया या देशातील इक्विटी व डेट विभागांतील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्याने ‘मिरे असेट बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड’ या खुल्या इक्विटी योजनेची घोषणा केली आहे. या फंडाचा एनएफओ २५ नोव्हेंबर २०२० रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून ४ डिसेंबर २०२० रोजी बंद होणार आहे. या फंडाचे हर्षद बोरावके आणि गौरव कोचर व्यवस्थापन करणार आहेत.

“बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र केवळ सर्वांत मोठेच नाही, तर ते भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वाधिक वैविध्यपूर्ण क्षेत्रही आहे. गेल्या २-३ दशकांत या क्षेत्राचे स्वरूप केवळ बँकांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर एनबीएफसी, विमा, एएमसी आणि कॅपिटल मार्केट कंपन्या आदी अनेक संलग्न व्यवसायांचा यात समावेश झाला आहे. येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठेल, असे सरकारला अपेक्षित आहे. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा (बीएफएसआय) क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने हे क्षेत्र वाढीचा प्रमुख चालक घटक ठरू शकते. बीएफएसआयकडे केवळ चक्रीय व्यवहारांसाठी न बघता, दीर्घकालीन दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे. वित्तीय सेवांची व्याप्ती सुधारणे, पत उपलब्धता आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे सरकारचे दीर्घकालीन उद्दिष्ट या सर्वांशी बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्र जोडलेले आहे आणि म्हणूनच ते अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या इंजिनासारखे आहे. साथीच्या काळानंतर आर्थिक क्षेत्रात जशा सुधारणा होत जातील, तसे हे क्षेत्र भारताच्या आर्थिक पुनरुज्जीवनात निर्णायक भूमिका पार पाडेल. असे असल्याने यातील गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा देऊ शकेल !

अभिप्राय द्या!