गेल्याच आठवड्यात मी रोटरी district च्या एका चांगल्या कार्यक्रमाला मडगाव येथे गेलो होतो. कार्यक्रम मोजक्या निमंत्रित लोकांसाठीच असल्याने कार्यक्रमस्थळ आटोपशीर पण चांगले असणार ह्याची खात्री होती.मडगाव शहराच्या मुख्य भागापासून पाच किमी अंतरावर व्ही.एम.साळगावकर institute of hospitality management ह्या नव्याने स्थापन झालेल्या collage मध्ये हा दीड दिवसाचा कार्यक्रम स्थानिक रोटरी club ने आयोजिला होता. ह्या संस्थेचे सर्व वरिष्ठ वर्गाचे विद्यार्थी आमच्या कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन करण्यासाठी सन्माननीय मिर्झा सर ( संस्थेचे M. D.) यांच्या सूचनेनुसार मनःपूर्वक सहभागी होते. कुठेही आपल्याला “उगाचच काम करावे लागत आहे “ ही भावना कोणाही विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुसटपणेसुद्धा जाणवतही नव्हती. आमच्या सर्वांच्या गाड्या पार्किंग पर्यंत नेणे , चहा , पाणी प्रत्येकाला मिळाले ना ? याची अगत्याने विचारणा करणे , गरमागरम जेवण वाढणे , पक्वान्न हाती आणून देणे ,या सर्व गोष्टी ही मुले आनंदाने करत होती. भारतातील अनेक प्रांतातील ही मुले दिसत होती. hospatality या एकाच शब्दाने ती आम्हा सर्वांशी मनःपूर्वक जोडलेली दिसली . आपली परीक्षा आहे असे समजून सुहास्यवदनाने सर्व बाबी आपल्याच घरचे कार्य असल्याप्रमाणे करण्याची ही सवय त्यांना या संस्थेने लावल्याचे पदोपदी जाणवत होते.
तीन वर्षाचा हा डिग्री कोर्स पूर्ण करण्यासाठी त्यांना काय खर्च आहे याची मी साहजिकच चौकशी केली. दरवर्षी रू तीन लक्ष फी , रू १.५० लक्ष निवास खर्च असा साधारणपणे शिक्षण पूर्ण होईस्तो किमान रू १८ लक्ष खर्च येतो असे मिर्झा सर म्हणाले . पण या सर्वांची placement परदेशी पंच/सप्त तारांकित हॉटेलमध्ये होते हेही त्यानी आवर्जून सांगितले.
hospatality काय असते हे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रत्येक कृतीतून समजावली !
पण अशा खर्चिक शिक्षणासाठी आपले पालक तयार आहेत का? सर्व पालकांना आपले मुल उच्चशिक्षित व्हावे असे वाटते , खर्चाचीही त्यांची तयारी असते , पण आर्थिक तरतूद मुलाच्या बालपणापासून केल्यास उच्चशिक्षण देणे सोपे होते हे माहित असूनही नको त्या गुंतवणुकीच्या योजना स्वीकारून अपुरी तरतूद झाल्याने कुठेतरी काटछाट होते व —–
म्हणून पालकांनी आपल्या बालकाच्या उच्च शिक्षणासाठी म्युच्युअल फंडांच्या career plans ची निवड योग्य सल्ला घेवूनच करावी !!