ईकॉमर्स तसेच ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणुकीकरिता इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड्स फंड ऑफ फंड लॉन्च केला आहे. हा फंड ४ डिसेंबर रोजी खुला होत असून १८ डिसेंबर रोजी बंद होईल. या योजनेत गुंतवणूकदारांना किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येईल.

गेमिंग, ऑनलाइन, ई-कॉमर्स, करमणूक, इंटरनेट सेवा यासारख्या कंपन्या जगभरातील लोकांच्या दारात पोहोचल्या आहेत. यात अमेझॉन, नेटफ्लिक्स, उबर यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व तंत्रज्ञान कंपन्या असून ग्राहकांना अधिक डिजिटल बनवित आहेत.कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड योजना आहे जी इन्व्हेस्को ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड्स फंडमध्ये गुंतवणूक करेल. हा फंड आपल्या मालमत्तेपैकी ९५ ते १०० टक्के ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड फंडमध्ये गुंतवणूक करेल.

कोव्हीड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डिजिटल जीवनात अधिक बदल झाले आहेत. जागतिक कंपन्या लक्षणीय महसूल मिळवत आहेत. अशा परिस्थितीत या कंपन्यांमध्ये येणा-या कालावधीत आणखी बदल अपेक्षित आहेत. नवीन पिढी पूर्णपणे डिजिटल होत आहे ज्याचा फायदा अशा कंपन्यांना होईल. गुंतवणूकदार यात एकरकमी अथवा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतात.

Leave a Reply