करोना संकट लक्षात घेता यंदा बँकांनी लाभांश वाटप न करत स्वनिधी आणि ताळेबंद सक्षम करावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना दिले. या निर्देशांमुळे बँकांमधील कोट्यवधी सभासदांना यंदा लाभांश उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. याचा मोठा फटका सहकार बँकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्देशांमधून सहकारी बँकांना वगळण्याचा आग्रही विनंती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संघटनेनेकडून केली जाणार आहे.

अभिप्राय द्या!