सोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का?

याबाबत विश्लेषकांचे म्हणणे आहे की तूर्त सोने अजूनही भरवशाचा पर्याय आहे. इतक्यात सोन्यात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सुरक्षित आणि जोखीममुक्त पर्याय म्हणून सोन्याची ओळख अबाधित आहे. सोन्याच्या किमतींचा इतिहास पहिला तर मागील दोन दशकांत सोन्याचा दर १० पटीने वाढला आहे. ग्राहकांनी एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, सोन्याचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा मर्यादित आहे. केवळ किरकोळ ग्राहकच नाही तर संस्थात्मक गुंतवणूकदार, केंद्रीय बँका यांच्याकडून देखील सोन्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सध्या करोना संकट काळात सोन्याच्या किमती वरचढ राहतील.

ब्रिटन आणि रशियात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही संपूर्ण जगभर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागेल. करोना साथ नियंत्रणात येऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल.

सरकारच्या डोक्यावरील वाढती कर्जे, महागाई आणि व्याजदर यासारखे घटक सोन्यातील तेजीसाठी पोषक ठरतील. त्याचबरोबर जागतिक बाजाराचा विचार केला तर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष, भारत-चीनमधील लडाखमधील तणाव याचाही परिणाम दिसून येईल त्यामुळे महागाई आणि चलनातील अवमूल्यन स्थितीत सोने नेहमी उपयुक्त ठरते. आणि आज long टर्म साठी सोने हाच उपयुक्त पर्याय आहे हे निश्चित !!

अभिप्राय द्या!