लॉकडाऊन, ठप्प झालेले उद्योगधंदे आणि त्यामुळे थांबलेलं अर्थव्यवस्थेचं चाक अशी सध्याची परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकऱ्या वा रोजगार बुडाले आहेत, अनेकांचं उत्पन्न बंद झालं आहे. अनेकांच्या पगारातही कपात झाली आहे. परिणामी गृहकर्जाचे हप्ते भरणं कठीण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने तीन महिने गृहकर्ज हप्ते न भरण्याची मुभा जरूर दिलेली आहे. पण तीन महिन्यांनंतर सर्वकाही लॉकडाऊनपूर्वी होतं, तसं ठीक होईल, असं अजिबात नाही. येणाऱ्या काळात आपल्यापैकी अनेकांना गृहकर्जाचे हप्ते भरणं कदाचित अशक्य होईल.
या संकटात काय करायला हवं?
एखादा कर्जदार जेव्हा हप्ते भरत नाही किंवा डिफॉल्टरबनतो, तेव्हा बँक त्या व्यक्तीचं कर्ज खातं लगेच बंद करून त्याचं घर ताब्यात घेत नाही. बँक सर्वप्रथम थकीत कर्जाची जास्तीत जास्त वसुली करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी बँक कर्जदाराशी चर्चा करण्याचा प्रयत्न करते.
समजा पूर्वी २० वर्षांसाठी गृहकर्जाचा मासिक हप्ता १० हजार रूपये होता. तर तो कमी करून ६ हजार रूपये ३० वर्षांसाठी करून घेऊ शकता. यात हप्त्याची रक्कम कमी होईल आणि गृहकर्जाची मुदत वाढेल. यामुळे तुमच्यावरील आर्थिक बोजा कमी होईल आणि बँकेचं नुकसानही होणार नाही. अर्थात मुदत वाढल्याने अधिक व्याज भरावं लागेल, पण सद्यस्थितीत ताण कमी होईल.
आणि defaulter बनण्यापासून तुम्ही वाचू शकता !! पण बँक अधिकाऱ्याना चुकवून पळ काढणे अत्यंत चुकीचे होईल !!