देशातील दुसरी मोठी म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणारी कंपनी असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’ या योजनेची श्रेणी बदलली आहे. ‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’ सिरीज-१ची श्रेणी क्लोज एंडेड वरून ओपन एंडेडमध्ये बदलली आहे. या योजनेची महिनाभरात मुदतपूर्तता होणार आहे. त्यापूर्वीच असा बदल करण्यात आल्याने गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’ची कामगिरी सुमार ठरली आहे. या योजनेत ३०८८ कोटी रुपये आहेत. दरम्यान या योजनेला ओपन एंडेड योजनेच्या श्रेणीत बदल केल्याने ही योजना लॉक इन पिरियडशिवाय निरंतर सुरु राहील आणि त्यात गुंतवणूकदार पैसे गुंतवतील, असे कंपनीचे मत आहे. मात्र या योजनेची आतापर्यंतची कामगिरी बघितली तर ती सुमार ठरली आहे. त्यामुळे सध्या ज्यांनी यात पैसे गुंतवले आहेत त्यांनी त्यातून काढून घ्यावे, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे.

अभिप्राय द्या!