म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना नव्या गुंतवणूकदारांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे
गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचा फंड निवडू?
ग्रोथ पर्याय बरा की dividend बरा ?
ह्या सर्वांनी कोणत्याही चांगला परतावा दिलेला लार्ज कॅप फंड निवडावा असे मी सुचवतो.
नावाप्रमाणेच हे फंड “लार्ज कॅप’ अर्थात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला स्टेट बॅंक, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, इन्फोसिस, आयटीसी या आणि यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्यासाठी “लार्ज कॅप’ फंड अतिशय योग्य ठरतात. शिवाय असे फंड एकाच प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना डायव्हर्सिफाइड फंडदेखील म्हणता येईल.
“लार्ज कॅप’ कंपन्यांचे भागभांडवल आणि विस्तार खूप मोठा असतो. त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने सुरक्षित ठरते. शिवाय वर्षानुवर्षे नफ्यात चाललेल्या या कंपन्या लाभांश, बोनस शेअर, हक्कभाग (राईट शेअर) यासारखे फायदे गुंतवणूकदारांना नियमितपणे देत असतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा “लार्ज कॅप’ म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना होतो. अशा फंडात दीर्घकाळासाठी नियमितपणे “एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक करत राहणे, हा आर्थिक यश मिळविण्याचा राजमार्ग म्हणता येईल. उदाहरणार्थ, “एचडीएफसी टॉप 200′ या “लार्ज कॅप’ फंडामध्ये वर्ष 1997 ते 2016 या वीस वर्षांत दरमहा दहा हजार रुपये “एसआयपी’ मार्गाने गुंतविलेल्या एकूण 24 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य जवळ जवळ 2 कोटी 90 लाख रुपये आहे. शिवाय या गुंतवणुकीतून मिळालेला संपूर्ण नफा हा दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या नियमानुसार पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त आहे. अर्थात “लार्ज कॅप’ फंडांची वाढ सावकाश होते, कारण ज्या मोठ्या कंपन्यांमध्ये या फंडांची गुंतवणूक असते, त्या कंपन्यादेखील सकारात्मक दिशेने; परंतु सावकाश वेगाने वाढत असल्याने अशा फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी धीर धरावा लागतो. गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही “लार्ज कॅप’ फंड पुढीलप्रमाणे: , यूटीआय इक्विटी फंड, मिरे ऍसेट इंडिया ऍपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय ब्लुचिप फंड, बिर्ला सनलाईफ टॉप 100 फंड, रिलायन्स टॉप 200 फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचिप इक्विटी फंड.
म्हणूनच गुंतवणुकीतील शिस्त आणि संयम पाळू शकणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराकडे एक तरी चांगला “लार्ज कॅप’ फंड दीर्घकाळासाठी असावा, असे वाटते.
simple,knowledgeable and inspiring data
thanks
pl circulate this through yr friend circle
ok