रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याचा अध्यादेश जारी केला. सुभद्रा लोकल एरिया बँकेला २०१३ मध्ये बँकिंग परवाना मिळाला होता. मात्र मागील काही वर्षे बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली. याबाबत रिझर्व्ह बँकेने तातडीने लक्ष घातले. दैनंदीन बँक व्यवहारासाठी बँक सक्षम नाही, असे कारण देत रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम २२ (४) अंतर्गतसुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द  केल्याचे जाहीर केले

अभिप्राय द्या!