२०२० हे साल आपल्या कायम स्वरुपी लक्षात राहील अशी दाट शक्यता आहे.याचे कारण म्हणजे (COVID) कोरोना महामारी.
यावर्षी आपल्या आसपासच्या अनेकांनी या महामारीचा अनुभव घेतला.
lockdown मुळे तर बसमधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांपासून ते तहत व्यवसायांनिमित्त परदेशी ये-जा करणा-या सर्व व्यावसायिकांना याची आर्थिक झळ बसलेली आहे. १० वी १२ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थी यांचे या वर्षभराच्या कालावधीमध्ये नुकसानच झाले आहे.
माझ्या परिचितांपैकी दोन-तीन डॉक्टर्स रूग्णांना सेवा देतानाच या महामारीचे बळी ठरले आहेत, आणि या सर्वापायी आपणा सर्वांना असा कालावधी पुन्हा आला तर आपले आर्थिक नियोजन कसे असावे याचा विचार करायला लावणारे २०२० हे साल ठरले आहे.
असे आर्थिक नियोजन करताना आपण ढोबळमानाने आपल्या मिळकतीचे विभाजन खालील नमूद केलेल्या योजनांद्वारे केल्यास या महामारीसारखी परीस्थिती पुन्हा उदभवल्यास आपल्याला किमान स्वरूपी आर्थिक चिंता भेडसावणार नाही हे निश्चित.

१. आपल्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी *NPS * ही योजना सध्यस्थितीत स्वीकरणे अत्यंत किफायतशीर आहे.

२. आपण सर्वजण LIC चा जीवन विमा घेतोच, पण आपली सध्याची जीवनशैली आपल्या पश्चात तशीच सुरू राहावी अशी इच्छा असेल तर आपण *Term Plan (मुदतीचा विमा) * घेणे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे.या दृष्टीने Bombay stock Exchange ने ICICI Prudential ची *iprotect * ही अत्यंत सुंदर Term Plan ची योजना गेल्याच आठवड्यात सुरू केली आहे.या अंतर्गत ५० लक्ष च्या Term Plan सोबतच्या ५० लक्ष Personal Accident Benefit मिळण्याची सोयसुद्धा आहे.

३. सध्या Bank किंवा Post मध्ये ठेवलेल्या मुदत ठेवीचे व्याजदर अत्यंत कमी झाले असल्याने आपल्या गुंतवणुकीचा निम्मा हिस्सा तरी म्युच्युअल फंड आणि चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतविणे आता अपरिहार्य होत आहे. यादृष्टीने खालील उदाहरणादाखल देत असलेल्या समभागांचा परतावा पहा.

१. १९८५ साली Britannia कंपनीच्या समभागामध्ये १० हजार रुपये गुंतविले असल्यास आज रोजी त्याचे १.०६ कोटी झाले असते.
२. तसेच १९९० साली shree cement कंपनीच्या समभागामध्ये १० हजार रुपये गुंतविले असल्यास आज रोजी त्याचे २.९० कोटी झाले असते.
३. १९९३ साली इन्फोसिस कंपनीच्या समभागामध्ये १० हजार रुपये गुंतविले असल्यास आज रोजी त्याचे ३ कोटी झाले असते.
४. १९८१ साली विप्रो कंपनीच्या समभागामध्ये १० हजार रुपये गुंतविले असल्यास आज रोजी त्याचे ४ कोटी झाले असते.

म्हणून आपणसुद्धा आपल्या गुंतणूकीतील काही भाग अशा चांगल्या समभागामध्ये गुंतवावा अशी अपेक्षा आहे.

४. आजकाल चांगल्या वैदकीय सेवा उपलब्ध झाल्या असल्यातरी त्यासाठी होणारा खर्च हा उच्च उत्पन्न असलेल्या लोकांच्याही आवाक्याबाहेर जात आहे.त्यादृष्टीने प्रत्येक व्यक्तीने *आरोग्य विमा घेणे * अत्यावश्यक झाले आहे आणि Bombay stock exchange अशा अनेक वेगवेगेळे पर्याय असलेले आरोग्य विम्याच्या सुविधा बाजारात उपलब्ध केलेल्या आहेत.

५. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे अशी सर्वच पालकांची इच्छा असते.पण त्यासाठी येणारा खर्च हा भविष्यात आपल्या आव्याक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुल जन्मताच त्याच्या भविष्यातील शैक्षणिक खर्चासाठी एखाद्या Multicap फंडातील SIP सुरू करावी अशी सर्व पालकांना विनंती राहील.

आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास येणा-या Challenging कालावधीला आपण सर्वजण निश्चितच तोंड देऊ शकाल याची मला खात्री वाटत असून त्यादृष्टीने वर देलेल्या मुद्यांचा २०२१ साल सुरू होण्यापूर्वी आपण विचार करावा अशी पुन्हा विनंती करून सर्व वाचकांना मी *नव वर्षाच्या शुभेच्छा * देत आहे.

धन्यवाद!!!

अभिप्राय द्या!