जानेवारी २०२१ पासून गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. विशेषतः टेलिव्हिजन (टीव्ही), रेफ्रिजरेटर (फ्रिज), वॉशिंग मशिन यांसारख्या उपकरणांच्या किंमती सुमारे १० टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज विविध कंपन्यांनी व्यक्त केला आहे. तांबे, अॅल्युमिनिअम व पोलाद यांच्या किंमतींत वाढ होत असल्यामुळे तसेच सागरी आणि हवाई वाहतुकीच्या शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवणार आहे.

अभिप्राय द्या!