सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत व पोस्टाच्या योजनांचे व्याजदर जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत आहे त्याच पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी जाहीर केला.
आगामी तिमाहीत पीपीएफ आणि एनएससीमधील गुंतवणूकदारांना अनुक्रमे ७.१ टक्के आणि ६.८ टक्के दसादशे या दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे पाच वर्षे मुदतीच्या ज्येष्ठ नागरीक ठेव योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दर दिला जाईल. या योजनेत ज्येष्ठ नागरीक ठेवीदारांना व्याज मात्र दर तिमाहीला दिला जातो. सुकन्या समृद्धी योजना (७.६ टक्के), किसान विकास पत्र (६.९ टक्के), तर पोस्टाच्या पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींवर ५.८ टक्के दराने व्याज लाभ मिळेल.