नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने चेकच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी positive pay यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सर्व धनादेश ‘पॉझिटिव्ह पे’मार्फतच जारी होणार आहेत. याशिवाय ग्राहकांना धनादेश काढताना तो कुणाच्या नावे आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. चेक देणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तीची माहिती पडताळून पाहिल्यानंतरच तो वटणार आहे.

‘पॉझिटिव्ह पे’च्या माध्यमातून चेक क्लिअरिंगला जाण्यापूर्वी त्याचा क्रमांक, चेक जारी करण्यात आल्याची तारीख, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रकमेसह अन्य तपशील बँकेतर्फे पुन्हा तपासण्यात येणार आहेत. चेक जारी करणाऱ्याला ज्याच्या नावे चेक देण्यात येणार आहे, त्याची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. दोघांची माहिती तपासल्यानंतरच बँकेतर्फे चेक क्लिअरिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या!