सन -२०२१ सुरू झाले !
गेल्या वर्षी किंवा यापूर्वी गुंतवणूक करताना आपण अनेक चुका केल्या असतीलच तर त्याच चुका या वर्षी होऊ न देण्याचा संकल्प आपण सर्वांनी यावर्षी केला पाहिजे !!
गुंतवणूक करताना टाळता येतील अशा चुका अगर गैरसमजुती!!
१. जास्त परतावा देणा-या गुंतवणुकीमागे धावणे म्हणजे आपले मुदद्ल धोक्यात घालणे होय !
(Ponzi) पॉनजी योजना- या आकर्षक असतात पण त्यातून मिळणारा परतावा हा अनेक वेळ आपली फसवणूक करू शकतो म्हणून अशा योजनेत आपली गुंतवणूक करूच नका.
२.म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गेल्या पाच वर्षात एखादी योजना भरघोस परतावा देणारी असली तरी त्याचा फंड मॅनेजर बदलला असल्यास / स्कीमचे उद्दीष्ट बदलले असल्यास आणि स्कीममधून गुंताविलेला गेलेला पैसा चुकीच्या फंडमध्ये गुंतविला गेला असल्यास अशा योजनेत आपला पैसा गुंतवू नये.
त्यापेक्षा एखादा liquid fund निवडून त्याद्वारे multicap फण्डामध्ये STP करणे हितावह ठरेल.
३.सोन्याचा भाव वाढतो आहे म्हणून आपण दागिने खरेदी करून त्याद्वारे सोन्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला आपल्या पैशाची liquidity मिळणे कठीण होऊ शकते.यासाठी पूर्णपणे liquidity असलेले Gold Bond घेणे हितावह ठरते.
४.सध्या शेअर बाजार Life Time उच्च स्तरावर आहे अशा वेळी शेअर बाजारातील शेअरमध्ये केलेली गुंतवणूक बाजार खाली आल्यास आपणास परतावा देण्यास असमर्थ ठरेल.म्हणून बाजार खाली येण्याची वाट पहावी आणि त्यानंतरच समभाग खरेदी करणे हितावह ठरेल.
५. म्युच्युअल फंड आणि समभाग यामध्ये पूर्णपणे माहिती न घेता आपण गुंतवणूक केल्यास आपली होणारी निराशा टाळण्यासाठी ‘NPS ’ या राष्ट्रीय निवृत्ती योजनेद्वारे आपले भविष्य आणि आर्थिक भवितव्य तज्ञ मंडळीच्या हाती देऊन आपण निश्चिन्त राहू शकतो हे निश्चित.यासाठी या सर्वांची माहिती घेण्यासाठी आपण एखाद्या चांगल्या तज्ञांचा सल्ला घेणे सुध्दा ध्यानी ठेवावे असे माझे मत आहे.
धन्यवाद !! Happy investing !!

अभिप्राय द्या!