तेजीने दौडणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज दुपारनंतर जोरदार नफावसुली दिसून आली. त्यामुळे सकाळच्या सत्रात ३०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स बाजार बंद होताना ८० अंकांनी घसरला. तो ४८०९३ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा nifty  ९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १४१३७ अंकावर स्थिरावला.

आज सकाळच्या सत्रात बाजारात तेजी दिसून आली. बँका, वित्त संस्था, फार्मा, स्थावर मालमत्ता, मेटल, टुरिझम या क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील प्रीमियममध्ये महाराष्ट्र सरकारने कपात केली आहे. त्यामुळे आज बाजारात रियल्टी शेअरला मागणी दिसून आली. शोभा, नेस्को, सनटेक रियल्टी, डीएलएफ, इंडीयाबुल्स रियल इस्टेट या शेअरमध्ये वाढ झाली.

भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, एल अँड टी , एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, ओएनजीसी , पॉवरग्रीड हे शेअर वधारले. अमेरिकेतील हिंसाचाराचे आज जगभरातील भांडवली बाजारावर पडसाद उमटले. जो बायडन यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेकडून आणखी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरचे मूल्य कमी झाले. त्यातच या अनिश्चित परिस्थितीत काही शेअरमध्ये नफावसुली दिसून आली.

अभिप्राय द्या!