गुंतवणूकदार पुन्हा एकदा म्युच्युअल फंड पर्यायाकडे वळल्याने एकूण फंड मालमत्ता डिसेंबर २०२० अखेर २९.७१ लाख कोटी रुपये झाली आहे.

तिमाही तुलनेत यात ७.६ टक्के वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण म्युच्युअल फंड गंगाजळी २७.६० लाख कोटी रुपये होती. भांडवली बाजारातील तेजीमुळे गेल्या तिमाहीत फंड मालमत्तांना बहर आल्याचे मानले जाते.
देशात ४५ फंड घराण्यांच्या विविध योजना आहेत. पैकी ४२ फंड कंपन्या कार्यरत आहेत. त्यातही एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, आदित्य बिर्ला सनलाइफ या चार फंड कंपन्यांचा एकूण फंड गंगाजळीत निम्मा हिस्सा आहे.

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीची मालमत्ता गेल्या तिमाहीत १३.६ टक्क्यांनी वाढून १.७७ लाख कोटी रुपये झाली आहे. तर डीएसपीची गंगाजळी ८९,४८७ कोटी रुपये आहे.

अभिप्राय द्या!