आयसीआय़सीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त प्रकारातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल हा नवीन म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसाठी बाजारात आणला आहे. समभाग तसेच त्याच्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आलेला आहे. व्यापार चक्राआधारे विविध क्षेत्रात तसेच समभागांमध्ये या फंडातील निधीची गुंतवणूक केली जाणार आहे.

हा बिझसेन फंड गुंतवणूकीसाठी शिखर ते तळ म्हणजेच टॉप डाऊन या पर्यायाचा वापर करणार आहे. या पर्यायात जागतिक तसेच देशातंर्गत ढोबळ अर्थव्यवस्थेपासून ते व्यापार चक्राच्या वाटचालीचे अवलोकन करत गुंतवणूकीसाठी विविध उद्योगक्षेत्र शोधून त्याआधारे त्या त्या क्षेत्रातील समभागांमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये निधी गुंतविला जाणार आहे.

बाजारात प्रसंगानुरुप सुरु असलेले व्यापार चक्र हे ढोबळ अर्थव्यवस्थेतील विविध घटकांची स्थिती, सरकारने या घटकांना वित्तीय तसेच पतधोरणाद्वारे दिलेल्या प्रतिसादानुसार हे चक्र वाढू अथवा आकुंचन पावू शकते. अशा स्थितीत गुंतवणुकीसाठी अनेक उत्तम संधी मिळू शकते.

शेअरबाजारातून मिळणारा परतावा सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेतील विविध व्यापार चक्र प्रभावित करत असतात. पारंपारिक व्यापार चक्रात वाढ, मंदी, घसरण आणि फेरवाढ हे चार टप्पे आढळतात. प्रत्येक टप्पा हा इतरांपेक्षा वेगळा असतो. अर्थव्यवस्थेतील हे प्रमुख टप्पे ओळखुन तसेच त्याच्या विश्लेषणाआधारे स्वीकारलेला गुंतवणूकीचा पर्याय हा सकारात्मक गुंतवणूकीचा अनुभव देण्यास मदत करु शकतो. एवढेच नव्हे तर त्या उद्योगक्षेत्रातील गुंतवणुकीत विविधता साध्य करण्याचे उद्दीष्टही साध्य केले जाऊ शकते.

येत्या १२ जानेवारी २०२१ पर्यंत त्यात गुंतवणूकीची संधी आहे.

अभिप्राय द्या!