ICICI Prudential Mutual Fund ही भारतातील आघाडीची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे.

भारतातील अग्रगण्य खासगी बँक ICICI Bank आणि UK मधील फायनान्शिअल सर्व्हीसेस सेक्टरमधील कंपनी Prudential यांचा तो संयुक्त उपक्रम आहे.म्युच्युअल फंडस्,विमा क्षेत्रातील एक अतिशय प्रथितयश कंपनी म्हणून या Joint Venture ने स्थान पटकावले आहे.
अशा या आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ६ जुलै २०१२ रोजी एका इंटरनॅशनल फंडाची सुरुवात केली. ICICI Prudential US Blue-chip Equity Fund ! S & P 500 TRI हा त्याचा बेंचमार्क इंडेक्स आहे.फंडामधील १०० टक्के गुंतवणूक Giant कंपन्यांमध्ये करणारा हा फंड असल्यामुळे सावध आणि सुरक्षित अशी गुंतवणूक करणा-यांसाठी हा फंड एक आदर्श फंड आहे. स्थापनेपासून १७ टक्के परतावा या फंडाने सरासरी दिला आहे.
गेल्या सात वर्षातील या फंडाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे.
१ वर्ष – १८.५६%
३ वर्ष – १८.६७%
५ वर्ष – १६.३३%
७ वर्ष – १३.४४%
प्रियंका खेडवाल आणि रोहन मारू हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. Services,Healthcare, FMCG पासून Energy पर्यंत सर्व सेक्टर्समधील Giant कंपन्यांमध्ये या फंडाने गुंतवणूक केली आहे. आपण इंटरनॅशनल फंडांमधील गुंतवणूक ही थोडी जोखमीची किंवा आक्रमक समजतो.त्या अनुषंगाने पाहता ICICI Prudential US Blue-chip Equity Fund फंडामधील गुंतवणूक ही Stable समजावयास हरकत नाही.कारण ती ख-या अर्थाने Diversified आणि पूर्णपणे अति बलाढ्य अशा कंपन्यांमध्ये केलेली आहे. या फंडाचे Top Holding जर पहिले तर तुम्हाला याची खात्री पटेल.
ICICI Prudential बहुतेक म्युच्युअल फंडांच्या योजनांचे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे त्यामध्ये रु.१०० इतक्या कमी रकमेची SIP करता येते. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांनाही इंटरनॅशनल फंडांचा लाभ घायचा असेल तर हा फंड अगदी आदर्श आहे.
केवळ अर्थशास्त्रावर विसंबून लोकांनी गुंतवणूक केली असती, तर जगभरच्या शेअर बाजारांमध्ये कधी मंदी आली नसती किंवा बँकांमध्ये कुणी मुदतबंद ठेवी ठेवल्याच नसत्या. परंतु चिंता, भीती, सांशकता, हाव,उताविळपणा या सगळ्या गोष्टी कोणत्याही मनुष्याच्या गुंतवणूक निर्णयांना प्रभावित करत असतात.दीर्घकाळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही चांगला लाभ मिळवून देते, हे लोकांना समजते. परंतु प्रत्यक्ष गुंतवणूक कण्याची वेळ येते तेव्हा ते सुरक्षित मार्गाचाच विचार करतात.
Diversification चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच अमेरिकेसारख्या विकसित देशांमधील बलाढ्य कंपन्यांच्या विकासाचे भागीदार होण्यासाठी परदेशातही गुंतवणूक केली पाहिजे, ही गोष्ट किती लोक प्रकर्षाने विचारात घेतात ?

कारण मुळात म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे प्रमाण,त्यातही इंटरनॅशनल फंडांमधील गुंतवणुकीचे प्रमाण पाहता लोक अजूनही साशंकच आहेत, हे लक्षात येते.आता Sebi, Amfi यांच्या अतिशय स्तुत्य अशा लोकांमध्ये गुंतवणूक सजगता वाढविण्याच्या प्रयत्नांमुळे लोकांचा गुंतवणुकीचा ओघ म्युच्युअल फंडांमध्ये वाढू लागला आहे, ही गोष्ट खरी आहे.

यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर शेअरखान सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा !
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!