गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांकडील ओढा कायम आहे. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंड व्यवसायाची मालमत्ता तब्बल 19 लाख कोटी रुपयांच्या पार पोचली आहे. इक्विटी, डेट आणि मनी मार्केट्समध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढल्यामुळे मालमत्तेने विक्रमी पातळी गाठली आहे. यादरम्यान, म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये 1.51 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक दाखल झाली.
यावर्षी म्युच्युअल फंडांची मालमत्ता 20 लाख कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. गुंतवणूकदार प्रामुख्याने इन्कम आणि इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूकीस पसंती देत आहेत. याशिवाय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग अर्थात एसआयपी गुंतवणूक प्रकाराकडे लक्षणीय ओढा वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. म्युच्युअल फंड संघटना ‘अॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्यांची मालमत्ता एप्रिलअखेर 19.26 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. मार्चअखेर हा आकडा 17.55 लाख कोटी रुपयेएवढा होता !!

अभिप्राय द्या!