शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ४८,७८२.५१

निफ्टी: १४,३४७.२५

येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने ४८,३०० आणि निफ्टीवर १४,३००च्या स्तरावर सातत्याने टिकल्यास, आपण सुरू केलेल्या जीपीएस ट्रँकिंग प्रणालीप्रमाणे निफ्टी निर्देशांकावर २०० अंशाची वृद्धी ही १४,५०० व नंतर १४,७०० आणि सेन्सेक्सवर ४८,८२५ ते ५०,००० अशी त्या त्या निर्देशांकाची वरची लक्ष्ये असतील.

अविरत पैशाच्या ओघामुळे असे वाटते की बाजारात घसरण ही अशक्यप्राय बनली आहे. एकंदरीत मनाची अशी धारणा बनत असल्याने या स्तरावर खरेदी करू या म्हटले तर तेही धाडसाचेच वाटते. या उच्चांकी स्तरावर समभाग खरेदी केले आणि बाजार कोसळला तर अशी ‘टू बी ऑर नॉट टू बी’सारखी गुंतवणूकदारांच्या मनाची द्विधावस्था झाली आहे. आज आपण या संभ्रमावस्थेच्या निवारणाचा प्रयत्न करू या.

आताच्या घडीला सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. जोपर्यंत हा स्तर राखण्यास निर्देशांक यशस्वी ठरतोय, तोपर्यंत तेजीची कमान कायम राहील. भविष्यात सेन्सेक्सला ४७,८०० आणि निफ्टीला १४,००० चा स्तर राखण्यास अपयश आल्यास, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४६,७०० आणि निफ्टीवर १३,७०० असे असेल.

अभिप्राय द्या!