पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) या ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या वित्तपुरवठा संस्थेने ५ हजार कोटींचे अपरिवर्तनीय रोखे बाजारात आणले असून १५ जानेवारीपासून खुली विक्री होणार आहे. या रोख्यांवर मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे.

देशातील विविध प्रकारच्या पारंपरिक व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी या ५ हजार कोटींचा उपयोग केला जाणार आहे. मूळ रोखे ५०० कोटी व लोकांच्या प्रतिसादानुसार आणखी ४५०० कोटी अशी ही एकूण ५ हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांची खुली विक्री होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ती होईल. तीन, पाच, १० व १५ वर्षे मुदतीचे हे रोखे असतील व त्यावर वार्षिक ४.६५ टक्के ते १५ वर्षांंसाठी दरवर्षी ७.१५ टक्के व्याज देण्यात येईल, आजकाल बॅंकांच्या मुदत ठेवींचे दर कमाल ६ टक्कय़ांपर्यंत घसरले असताना सामान्य गुंतवणूकदारांना सव्वा सात टक्के व्याज कमावण्याची ही संधी आहे.

अभिप्राय द्या!