तारुण्य म्हणजे कशाचीही चिंता न करता आयुष्याचा आनंद लुटणे. एक तरुण म्हणून तुम्ही मित्रांसोबत किंवा सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवत असाल. मोठ्या स्वप्नांना गवसणी घालण्याचं तुमचं ध्येय असेल. हेच वय असतं जेव्हा तुम्ही रिस्क घेण्यासाठी तयार असता. या वयात जीवन, मृत्यूचे विचारही मनात येत नसतात. यात कोणतीही चुकीची गोष्ट नाही. पण मृत्यू हे शाश्वत सत्य आहे याची जाणीव असणं आणि जागरुक असणंही गरचेचं आहे.

एखाद्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणीही भरुन काढू शकत नाही. अशावेळी मुदत विमा योजना एक उपाय आहे ज्याकडे तरुणांनी दुर्लक्ष करता कामा नये. एक तरुण म्हणून जर तुम्हाला विमा योजनेची गरज नाही असं वाटत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. वेळ वाऱ्याप्रमाणे निघून आणि लवकरच तुमचं लग्न होईल आणि सोबतच नवं कुटुंब आयुष्यात येईल. अकाली मृत्यू अनेक स्वप्नं, ध्येय आणि आकांक्षा अपूर्ण ठेऊ शकतात.

आर्थिकदृष्या आपल्यावर अवलंबून आहेत अशा सर्वांनी तर मुदत विमा योजना घेतलीच पाहिजे. जर तुम्ही तरुण आणि अविवाहित असाल तर तुमचे आई-वडील आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून असतील. आणि जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देणं गरजेचं आहे. आपल्यामागे कुटुंबातील सदस्यांचा राहणीमान दर्जा कायम ठेवण्यासाठी मुदत विमा योजना एक साधन आहे. एकाअर्थी पहायला गेल्यास, ही योजना कुटुंबाची जबाबदारी असणारी व्यक्ती पाठिंबा देण्यासाठी नसतानाही कुटुंबाच्या उत्पन्नावर काही परिणाम होणार नाही याची काळजी घेतं.

मुदत विमा योजना कशा पद्दतीने काम करतं याची प्रक्रियाही सोपी आहे. वय, विम्याची रक्कम आणि किती काळासाठी विमा हवा आहे याच्या आधारे विम्याचा हप्ता ठरवला जातो. जितक्या काळासाठी विमा घेतला आहे तोपर्यंत हप्ता भरावा लागतो. विमा योजना सुरु असताना व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम देते. मुदत विमा ही विम्याची सर्वाधिक चांगली योजना आहे. कारण यामध्ये मॅच्यूरिटी व्हॅल्यू नसून पूर्णपणे सुरक्षा प्रदान केली जाते.

अभिप्राय द्या!