दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक इमारतीतील तळघरात अर्थसंकल्पाच्या छपाईची प्रक्रिया पार पडली जाते. छपाईच्या कामाचा शुभारंभ अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करून केला जातो. छपाई आरंभी मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो. अर्थमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी या सोहळ्याला उपस्थित असतात. तो हलवा नंतर सर्वाना वाटून तोंड गोड केले जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई केली जाते. यंदा मात्र बजेटची मोजकी छपाई केली जाणार आहे. काटकसर म्हणून सरसकट बजेटच्या हजारो प्रती न छापण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

अभिप्राय द्या!