करोना संकटात भांडवली बाजारात होणारी पडझड, लॉकडाउनमुळे वाढलेली बेरोजगारी असा कठीण काळ असताना देखील म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदार आणखी जागरूक झाल्याचे दिसून आले आहे. २०२० मध्ये म्युच्युअल फंडांची तब्बल ७२ लाख नवीन खाती सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ च्या तुलनेत या वाढ झाली.

म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) या संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये म्युच्युअल फंडांचे ७२ लाख नवीन फोलिओ सुरु झाले. २०१९ मध्ये ६८ लाख नवीन फोलिओ सुरु झाले होते.

झटपट ऑनलाइन प्रक्रियेमुळे म्युच्युअल फंडाचे खाते सुरु करणे सोप्प झाले आहे.त्याचाही परिणाम म्युच्युअल फंडाचे फोलिओ वाढण्यात झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Reply