आपल्या मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिक असो किंवा नोकरदार असो बचत करण्याची सवय ही अंगी बाणलेली असते.पण बचतीचे रुपांतर *गुंतणूकीत करून त्याद्वारे आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा कल * अनेकाकडे नसतो.
वयाच्या ६० ते ६५ नंतर आपली निवृत्ती आणि ४५ ते ५० आसपास आपल्या मुलांचे उच्चशिक्षण व विवाह या जबाबदा-या कोणालाच टाळता येणा-या नसतात.
त्यादृष्टीने Mutual फंडामधील दीर्घकालीन SIP ही आपली उद्दीष्टे गाठण्यास अत्यंत महत्वाचे साधन असू शकते.SBI Mutual Fund तर्फे निवृत्ती नियोजन संदर्भात एक चांगला Mutual Fund सुरू करण्यात आला असून त्याचा NFO ३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद होणार आहे.त्यानंतर आठवड्याभरात त्यामध्ये आपण केव्हाही SIP द्वारे गुंतवणूक करून आपले निवृत्ती नियोजन सुरू करू शकतो.
फंडाची वैशिष्टे
१ – या फंडामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणूकीच्या सुरुवातीच्या वयानुसार Aggressive, Aggressive Hybrid, Conservative, Conservative Hybrid अशा गुंतवणुकीसाठीच्या चार सुविधा प्राप्त होऊ शकतात.
Aggressive गुंतवणूकदार हा सामान्यत: वयाच्या २५-२८ या वयोमर्यादेतील गुंतवणूकदार गृहित धरला असून Conservative गुंतवणूकदार वयाच्या ५५ वर्षानंतरचा गृहीत धरला आहे. Aggressive प्रकारातील गुंतवणूक ही ८०% Equity प्रकारातील असणार असून Conservative गुंतवणूकदारासाठी Equity प्रकारातील २०% गुंतवणूक राहणार आहे.
वाढत्या वयानुसार या चार प्रकारात बदल करण्याचा पर्याय गुंतवणूकदाराला मिळू शकतो.यामध्ये नियमितपणे गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदाराला त्याच्या प्रथम वर्षाच्या १०० पट विमा संरक्षणसुद्धा उपलब्ध होऊ शकते.
२ – या गुंतवणुकीचा lock – in period किमान पाच वर्षाचा आहे.
* या गुंतवणुकीला आयकर कलम 80 C अंतर्गत Deduction उपलब्ध नाही.
३ – या फंडातील गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदाराला Gold ETF आणि परदेशी कंपनीच्या समभागातील गुंतवणुकीचा फायदा घेता येऊ शकेल.
४ – सध्या अस्तिवात असलेल्या इतर Mutual Fund House च्या निवृत्ती नियोजन योजनापेक्षा ही योजना अत्यंत Flexible प्रकारची असल्याने सर्वप्रकारचे व्यावसायिक व नोकरदाराना उपयुक्त ठरणारी आहे.
यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास आणि गुंतवणूक सुरू करावयाची असल्यास आमच्या कार्यालयाशी ३ फेब्रुवारी २०२१ पूर्वी संपर्क साधावा अशी अपेक्षा आहे.
प्रदीप प्रभाकर जोशी
संपर्क – 9422429103

अभिप्राय द्या!