म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो आणि या गुंतवणूक प्रकारचे फायदे अनेक आहेत हे सर्वश्रुत आहे. गुंतवणुकीतील सातत्य आणि नियमितता पाळण्यासाठी हा पर्याय अतिशय उपयोगी ठरतो; शिवाय शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे वाढणारी जोखीमदेखील या पर्यायाने कमी होते. शेअर बाजाराच्या प्रत्येक टप्प्यावर आपली गुंतवणूक होत असल्याने या गुंतवणुकीतील जोखीम तुलनेने कमी राहते आणि फायदादेखील उत्तम मिळू शकतो. याच कारणासाठी छोट्या गुंतवणूकदारांनी “एसआयपी’द्वारे गुंतवणूक करावी, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देताना दिसतात. याउलट, म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक जोखीमयुक्त ठरू शकते, असा सल्ला दिला जातो. बाजार वरच्या पातळीवर असताना एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यानंतर काही कारणाने बाजार कोसळला, तर गुंतवणुकीवर मोठा तोटा दिसतो आणि बाजार पुन्हा पूर्णपणे सावरेपर्यंत आपल्याला थांबावे लागते. त्यामुळे अशी एकरकमी मोठी गुंतवणूक टाळावी, असा सल्लादेखील अनेकजण देतात.

म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक आणि “एसआयपी’ गुंतवणूक या दोन्ही पर्यायांचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे या दोन पर्यायांची तुलना करण्याऐवजी गुंतवणूक सुरू करताना “एसआयपी’ने करावी म्हणजे बाजारातील आपला प्रवेश सोपा होतो आणि रक्कम छोटी असल्याने दडपणदेखील येत नाही. त्यानंतर ज्या वेळी बाजार खाली जाईल, त्या वेळी “एसआयपी’च्या जोडीला एकरकमी गुंतवणूक करावी. दोन्ही गुंतवणुकींचा कालावधी मोठा म्हणजे वरीलप्रमाणे वीस वर्षे ठेवावा म्हणजे दोन्ही गुंतवणुकींचे फायदे आपल्याला मिळू शकतील.

फक्त गुंतवणुकीचा कालावधी मोठा असावा हे महत्वाचे !!

अभिप्राय द्या!