भांडवली बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत ‘इंडिगो पेंट्स’ने गुंतवणूकदारांना आज मालामाल केले. आज मंगळवारी ‘इंडिगो पेंट्स’चा शेअर भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. आयपीओमध्ये निश्चित केलेल्या किमतीपेक्षा तब्बल ७५ टक्के अधिक किमतीवर ‘इंडिगो पेंट्स’च्या शेअरने बाजारात एंट्री घेतली.’इंडिगो पेंट्स’चे शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार कमाई केली.

आज मंगळवारी इंडिगो पेंट्स मुंबईत शेअर बाजारात २६०८.५० रुपयावर सूचीबद्ध झाला. आयपीओतील इश्यू प्राईसपेक्षा ७५ टक्के अधिक किमतीवर त्याची नोंदणी झाली. इंडिगो पेंट्सचा आयपीओ ११७ पटीने ओव्हरसब्सक्राइब झाला होता. ५५.१८ लाख शेअरसाठी तब्बल ६४.५८ कोटी शेअरसाठी बोली लावण्यात आली. तर ग्रे मार्केटमध्ये इंडिगो पेंट्सचा शेअर ८२० रुपये अधिक प्रीमियमवर उपलब्ध होता.

अभिप्राय द्या!