रिझव्र्ह बँकेच्या सलग चौथ्या व्याजदर आहे त्या पातळीवर स्थिर राखणाऱ्या पतधोरणानंतरही ठेवी तसेच कर्जावरील व्याजदरात मात्र बदल होणार आहेत. व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडे ठेवाव्या लागणाऱ्या रोख राखीव निधीच्या (सीआरआर) प्रमाण नव्या वित्त वर्षांपासून पूर्ववत ४ टक्के पातळीवर आणले जाणार आहे, त्याचा परिणाम बँकांच्या ठेवी तसेच कर्जाच्या व्याजदरावर एप्रिलपासून पुढे दिसून येऊ शकेल.
- Post published:February 6, 2021
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments