नाशिकमधील इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. (Independence Co-operative Bank Limited, Nashik) त्यामुळे बँकेच्या खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत. बँकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने ‘आरबीआय’कडून खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास ९९.८८ टक्के खातेदार हे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या विमा सुरक्षेसाठी पात्र आहेत. या विमा सुरक्षा योजनेत बँक खातेदाराला पाच लाखांपर्यंतच्या ठेवीवर विमा सुरक्षा पुरवली जाते. मात्र रिझर्व्ह बँकेकडून तूर्त इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या!