म्युच्युअल फंड उद्योगातील आघाडीचे फंड घराणे असलेल्या महिंद्रा मनुलाईफ म्युच्युअल फंडाने डेट श्रेणीतील नवी गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंड ९ फेब्रुवारी रोजी खुला झाला असून यात १ ते ३ वर्ष मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे.

जोखीम, तरलता आणि एक ते तीन वर्ष मुदतीत चांगला परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंड चांगला पर्याय आहे. त्याशिवाय पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये ही योजना गुंतवणूकदारांना जोखीम आधारित चांगला परतावा देईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंड या योजनेतील १०० टक्के निधी हा डेट आणि मनी मार्केटमधील पर्यायांमध्ये गुंतवण्यात येणार आहे. त्यातही १० टक्के निधी हा REITs & InvITs यामध्ये गुंतवला जाणार आहे. गुंतवणूक कारण्याजोगे सुरक्षित पर्याय यात शोधले जातात. १ ते ३ वर्ष मुदतीच्या योजनेत ग्रोथ आणि डिव्हीडंड असे पर्याय आहेत. महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंडमधील गुंतवणूक रचना ही १ ते ३ वर्ष कालावधी असून जोखीम कमी ठेवण्यासाठी त्याचा सातत्याने आढावा घेतला जाईल.

महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंडाची एकही डेट योजनेने अद्याप डिफॉल्ट केलेला नाही.

अभिप्राय द्या!