कॅनरा बँक ही भारतातील  राष्ट्रीय बँक आहे.११३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणा-या या बँकेच्या दहा हजारांहून अधिक शाखा आहेत आणि जवळपास नऊ कोटी ग्राहक आहेत.अशा या बँकेने १९८७ साली ‘ कॅनबँक म्युच्युअल फंड’ ची स्थापना केली.
१९२९ पासून काम करणारी रोबेको ग्रुप ही नेदरलॅंड मधील जागतिक दर्जाची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे.१५ देशांमध्ये तिचा विस्तार आहे.
कॅनबँक म्युच्युअल फंड आणि रोबेको २००७ साली एकत्र आले आणि त्यांनी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ची स्थापना केली. भारतामध्ये आज काम करणा-या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ही एक दर्जेदार कंपनी आहे.
कॅनरा रोबेको इव्कीटी हायब्रीड फंड हा  या कंपनीने १ फेब्रुवारी १९९३ रोजी सुरू केला.

३१ डिसेंबर २०२० रोजी फंडाचा AUM (Assets Under Management) ४१७० कोटी रु आहे !!स्थापनेपासून सरासरी १२.६४ टक्के परतावा देणा-या या फंडाची गेल्या दहा वर्षासाठी आर्थिक कामगिरी खालीलप्रमाणे आहे.
• १ वर्ष रिटर्नस् – २१.७२ टक्के
• ३ वर्षे रिटर्नस् – १२.९१ टक्के
• ५ वर्षे रिटर्नस् – १४.९४ टक्के
• ७ वर्षे रिटर्नस् – १६.७९ टक्के
• १० वर्षे रिटर्नस् – १३.७६ टक्के
Value Research या संस्थेचा ५ Star रेटिंगचा दर्जा सातत्याने मिळवणारा हा फंड आहे.३१ डिसेंबर २०२० रोजी फंडाचे Asset Allocation खालीलप्रमाणे होते.
• Equity – 73.71 %
• Debt – 15.26 %
• Other – 11.03 %

इव्कीटीपैकी बहुतेक सर्व गुंतवणूक ही Giant कंपन्यामध्ये आहे.फंडाचे खालील Top 10 Holding पाहिले तर ही गोष्ट लक्षात येईल.
1 ) HDFC Bank , 2) Infosys , 3) ICIC Bank, 4) Reliance Industries ,5) Axis Bank, 6) TCS, 7) HDFC, 8) Bajaj Finance, 9) Hindustan Unilerer, 10)HCL Tech.
फंडाची गुंतवणूक Giant कंपन्यामध्ये असल्यामुळे यातील गुंतवणूक  कमी जोखमीची आहे.त्यामुळे कमी जोखीम हवी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अगदी योग्य फंड आहे. तसेच हा फंड नियमितपणे मासिक डीव्हीडंड देतो.
बँकपेक्षा अधिक मासिक परतवा शिवाय भांडवल वृद्धी ! असा दुहेरी लाभ हवा असल्यास ह्या फंडचा नक्की विचार करावा !!

अभिप्राय द्या!