कोणता term plan ( मुदत विमा ) घ्यावा यासाठी अनेकदा विचारणा होते पण बरेच विक्रेते यामध्ये भरलेल्या रकमेपासून काहीही मिळत नाही असे सांगून term plan घेण्यापासून परावृत्त करतात.पण term plan चा हप्ता हा अत्यंत कमी / नगण्यच असतो व मिळणारे कवच सुयोग्य असते , यासाठी व आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या सांभाळण्यासाठी मुदत विमा घेणे अत्यंत योग्य आहे !!

भारतातील आघाडीची खासगी आयुर्विमा कंपनी एचडीएफसी लाइफने, भारतात उपलब्ध झालेली सर्वात व्यापक संरक्षण प्रदान करणारी आणि परवडण्याजोगी मुदत विम्याची (टर्म प्लान) योजना एचडीएफसी लाइफ क्लिक २ प्रोटेक्ट ३डी प्लस, नावाने प्रस्तुत केली असून, जी आजीवन पर्याय, उत्पन्न पुन:स्थापना आणि भरलेल्या हप्त्यांची परतफेड असे तब्बल ९ पर्यायांमधून निवड करण्याची मुभा ग्राहकांना प्रदान करते.

ग्राहकांच्या जीवनशैलीविषयक गरजा लक्षात घेतल्यानंतर, या सर्व गरजांची पूर्तता करू शकेल अशी ही नवीन  एचडीएफसी लाइफ क्लिक २ प्रोटेक्ट ३डी प्लस योजना आहे !

, “मृत्यू, अपंगत्व, रोग या सारख्या जीवनातील संभाव्य प्रतिकूल परिस्थितीपासून ही योजना केवळ संरक्षण देते ,आणि  आजीवन संरक्षणासारखा पर्याय देणारी हा पहिलाच अनोखा मुदत विमा आहे ज्यात वारसाहक्काचेही नियोजन यशस्वीपणे करता येते. या व्यतिरिक्त उत्पन्न पुन:स्थापनेचा पर्याय हा पगारदार व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

ज्यांना आपल्या जबाबदाऱ्या माफक तसदी घेवून योग्य रित्या सांभाळणेच्या आहेत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे !!

तसेच ज्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर लहान लहान पतसंस्थांकडून कर्जे घेतली आहेत त्यांनी तर ही योजना अवश्य घ्यावी !!   आपले काही अघटीत घडल्यास या योजनेमुळे कुटुंब सुरक्षित राहू शकेल !!

This Post Has 2 Comments

  1. Sanjay yashwant joshi

    Self employed sathi thik ahe ka, mazya hdfc pension plan ahet.

    1. Pradeep Joshi

      i will call u today

अभिप्राय द्या!