बुधवारी सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold & Silver Rate) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. बुधवारी सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. आज एक तोळा सोनं ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज आठ महिन्यांमधील नीचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५६ हजार २०० पर्यंत पोहचला होता. तेव्हापासून आजपर्यंत सोनं प्रति तोळा नऊ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

अभिप्राय द्या!