मागील सहा महिन्यांपासून ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्यासाठी तयारी करणाऱ्या टाटा समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायातील ‘बिग बास्केट’ या कंपनीची थेट खरेदी केली आहे. बिग बास्केटमधील तब्बल ६८ टक्के हिस्सा टाटा समूहाने ९५०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या डीलनंतर टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश सुकर झाला आहे.
टाटा समूह एक सुपर अॅप विकसित करत असल्याचे म्हटलं होते. टाटा सन्स आपल्या सुपर अॅपसाठी तोडीचा भागिदाराचा शोध टाटा समूहाकडून घेतला जात होता. टाटा या सुपर अॅपच्या माध्यमातून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे व्यवसाय एकाच छताखाली आणण्याची टाटा समूहाची योजना आहे. या सुपर अॅपमध्ये डिजिटल कंटेंट आणि शैक्षणिक कंटेंटही उपलब्ध असेल, असेही बोलले जाते.