motilal ostwal असेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) दोन न्यू फंड ऑफर्सची (एनएफओ) घोषणा केली आहे.

मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन पॅसिव फंड- अॅग्रेसिव आणि मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन फंड पॅसिव फंड ऑफ फंड्स-काँझर्वेटिव्ह असे दोन फंड 19.02.2021पासून  गुंतवणुकीसाठी खुले झाले. हे फंड ऑफ फंड्स (एफओएफ्स) डिजिटल पार्टनर ग्रोव (Groww) अॅपवरही उपलब्ध आहेत.

यामुळे गुंतवणूकदाराला त्याची जोखीम पत्करण्याची तयारी व गुंतवणुकीची उद्दिष्टे यांच्या प्रमाणे कमी खर्चाच्या तसेच वैविध्यपूर्ण असेट्समध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. मर्यादित (मॉडरेट) पोर्टफोलिओच्या शोधात असलेला गुंतवणूकदार दोन्ही फंड्समध्ये ५०:५० गुंतवणूक करू शकतो. आत्तापर्यंतच्या सर्वांत निचांकी स्तरावरील संबंधित असेट वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याचा लाभ दोन्ही फंड्स घेऊ शकतात.

एनएफओ बंद होण्याची तारीख : ५ मार्च २०२१
वितरणाची तारीख: १२ मार्च २०२१

अभिप्राय द्या!