केंद्र सरकारने स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) नियम आणखी कडक केले आहेत.

सध्या बहुतांशी स्वयंसेवी संस्थांची बॅंक खाती ही साधारणत: सहकारी बॅंका, राज्य बॅंका किंवा तत्सम बॅंकांमध्ये आहेत. ज्यामध्ये कोअर बॅंकींगची सुविधा उपलब्ध नाही, परकी योगदान नियामक कायद्यान्वये स्वयंसेवी संस्थांची नोंदणी होऊन त्यांना राष्ट्रीय बॅंका अथवा कोअर बॅंकींग सुविधा असणाऱ्या खासगी बॅंकांमध्ये खाती सुरू करणे आवश्‍यक असावे, याबाबत केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत. कोअर बॅंकींग सुविधेमुळे बॅंकांचे एकत्रित व्यवहार पाहणे सोपे जाते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांच्या बॅंक खाती तपासणीसाठी सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात.

अभिप्राय द्या!