राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने वाया गेलेली शेअर व्यवहारांची वेळ सेबीने वाढवली आहे. आज दोन्ही शेअर बाजार नेहमीच्या वेळेपेक्षा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, असे सेबीने जाहीर केले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे.

मुंबई शेअर बाजार  आणि राष्ट्रीय शेअर बाजा सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत सुरु असतात. मात्र आज सकाळी ११.४० मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाले. कोट्यवधींचे व्यवहार सुमारे तीन तासांहून अधिक वेळ ठप्प झाले होते. दुपारी ३.४५ मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार पूर्ववत झाले.

अभिप्राय द्या!