राष्ट्रीय शेअर बाजारातील तांत्रिक अडथळा बुधवारी प्रमुख निर्देशांकाच्या पथ्यावर पडला. आठवडय़ातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून निर्देशांक वाढ नोंदवणारा सेन्सेक्स व निफ्टी दुपारच्या खंड व्यवहारानंतर विस्तारित व्यवहार कालावधीत लक्षणीय तेजी नोंदवता झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवार सायंकाळअखेर १,०३०.२८ अंशवाढीने ५०,७८१.६९ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७४.२० अंशवाढीसह १४,९८२ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारच्या तुलनेत जवळपास प्रत्येकी २ टक्के वाढ नोंदली गेली.

सेन्सेक्स ३० मध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, ५ टक्क्यांनी झेपावला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँकही वाढले. गुंतवणूकदारांकडून विशेषत बँक व वित्त क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली, तर पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज्, टीसीएस, एशियन पेंट्स आदी घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकात दूरसंचार, भांडवली वस्तू, ऊर्जा वाढले, तर बहुपयोगी क्षेत्रीय निर्देशांक घसरला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प व स्मॉल कॅ प एक टक्क्यापर्यंत वाढले.

अभिप्राय द्या!