वेगाने वाढणाऱ्या भारतातील म्युच्यूअल फंडांपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने मुदतमुक्त प्रकारात नवीन म्युच्यूअल फंड बाजारात आणला आहे. प्रामुख्याने एए प्लस आणि त्यापेक्षा अधिक पतदर्जा असलेलल्या डेट योजनांमध्ये या फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. हा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून ९ मार्च २०२१ ला बंद होणार आहे. या फंडासाठी निफ्टी कॉर्पोरेट बॉण्ड इंडेक्स हा आधारभूत निर्देशांक आहे. या फंडाचे व्यवस्थापन नियमित उत्पन्न विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेंद्र जाजू करणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून परतावा आणि रोखता हे दोन्ही हवे आहेत. मिरे अॅसेट कॉपोरेट बॉण्ड फंड मध्यम प्रकारची जोखीम घेत उत्पन्न मिळवून देताना उच्च दर्जा आणि रोखता यावर कायम आपले लक्ष केंद्रीत ठेवतो. या फंडातील गुंतवणूक ही प्रामुख्याने अव्वल कंपन्यांमध्ये राहणार असल्याने जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेवर आमचे लक्ष केंद्रीत राहणार आहे, असे मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स ( इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरुप मोहंती यांनी सांगितले.