एकीकडे भांडवली बाजारात चौफेर विक्रीचा सपाटा सुरु असताना अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारच्या मालकीची रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (RailTel Share List on Premium Today) शेअरने आज दोन्ही शेअर बाजारात दमदार नोंदणी केली. ‘रेलटेल’चा शेअर इश्यू प्राईसच्या १६ टक्के अधिक किमतीवर सूचीबद्ध झाला. त्यामुळे ‘आयपीओ’त ‘रेलटेल’चे शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना  सुखद धक्का मिळाला.

‘रेलटेल’च्या आयपीओ योजनेला गुंतवणूकदारांनी अपेक्षेनुसार चांगला प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ ४२ पटीने सबस्क्राईब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा १६.७८ पटीने सबस्क्राईब झाला. मंगळवारी आयपीओत भाग्यवान ठरलेल्या गुंतवणूकदारांना शेअर वाटप करण्यात आले होते. आज शुक्रवारी रेलटेलच्या शेअरची मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाली.

अभिप्राय द्या!