सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत २०२०-२१ (मालिका XII) १ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत खुली होणार आहे. यासाठी प्रती ग्रॅम ४६६२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. जे गुंतवणूकदार या रोख्यांसाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्राम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. या गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत ४६१२ रुपये प्रति ग्राम सोने अशी असेल.

या योजनेसाठी प्रती ग्रॅमसाठी ४६६२ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील ही बारावी मालिका आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

अभिप्राय द्या!