प्राथमिक बाजार (Primary Market)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन प्रकार उपलब्ध असतात.
पहिला प्रकार हा प्राथमिक बाजार ( Primary Market ) असून आपण नेहमी जिथे शेअर ट्रेडिंग करतो त्याला (Secondary Market ) मार्केट असे म्हटले जाते.

Secondary मार्केट मध्ये बहुतांशी व्यवहार हे आपल्या DP मार्फत NSE व BSE ह्या दोन प्लॅटफॉर्मवर मुखत्वे होतात,आणि ब-याच जणांना प्राथमिक मार्केटसंबधी खूप कमी माहिती असते.

एखादी नवीन कंपनी बाजारात लिस्टिंग होणार असेल तर त्याच्या प्रवर्तकांना सेबी कडे नोंदणी करून प्राथमिक बाजारात आपले समभाग लोकांसाठी उपलब्ध करून द्यावे लागतात.त्याची रक्कम, त्याचा दर आदिबाबतची माहिती विवरण पत्रकात देवून आपण उभारत असलेला निधी कोणत्या प्रकारच्या वृद्धीसाठी वापरणार आहोत हे उद्दीष्ट नमूद करावे लागते .

अर्थात या सर्व बाबीवर सेबीचे नियंत्रण असते.जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्राथमिक मार्केट (Primary Market ) मधून जवळजवळ रुपये २०६१२ कोटी रुपये निधी शेअर बाजारात आला आहे !

आणि यावर्षी अर्थसंकल्ल्पात जाहीर झाल्यानुसार सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक साधारणत: दीड ते २ लाख कोटी रुपये होणे अपेक्षित आहे. मा . पंतप्रधानांनी आताच जाहीर केल्यानुसार AIR INDIA ,LIC,IDBI BANK आणि अनेक सरकारी बँकांच्या खाजगीकरणाच्या तत्त्वानुसार येणारे वर्ष हे IPO चे वर्ष आहे असे मानण्यास भरपूर वाव आहे. LIC च्या IPO द्वारे तर भारतातील सर्वात मोठी निर्गुंतवणूक होणार असल्याच्या बातम्या आहेत आणि हा IPO आपल्याला खरेदी करावयाचा असेल तर आपले DEMAT खाते असण्याबरोबरच ,बँक खाते ASBA FACILITY असणारे असणे आवश्यक आहे.
आत्मनिर्भर भारत  ही घोषणा पंतप्रधानांनी केल्यानंतर किंवा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजार हा अडीच टक्केपर्यंत वधारला होता. आणि एकंदरीत पाहता यापुढील भारतीय शेअर बाजाराची वाटचाल ही वर्षाला किमान १० ते १२% परतावा देणारी होऊ शकेल अशी स्थिती आहे.

आणि हे सर्व पाहता प्रत्येक सामान्य माणसानेसुध्दा किमान पक्षी आपले DEMAT खाते सुरू करून त्याद्वारे उपलब्ध असणा-या सर्व सुविधाचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे.

फक्त बचत करून उपयोगी नाही तर बचतीचे रुपांतर गुंतवणुकीत आणि गुंतवणुकीचे रुपांतर आर्थिक ध्येय सिद्धीमध्ये * करणे यातच खरे शहाणपण ठरणार आहे.
प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!