राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) गेल्या चार वर्षात आपल्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने मोठी गुंतवणूक केली आहे. ‘एनएसई’ने या भांडवलावरील वर्षिक रोख खर्चात साधारण तिपटीने वाढ केली असून आतापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपये गुंतवले आहेत.

सध्या ‘एनएसई’कडे एक मजबूत, लवचिक, सुरक्षित आणि त्रुटीविरहित तंत्रज्ञान पायाभूत व्यवस्था असून या व्यवस्थेत त्या त्या उपकरण क्षेत्रात सर्वोत्तम अशा कंपन्या-जसे सिस्को, एचपी, डेल, हिताची, चेकपॉईंट, पालो ऑल्टो, ऑरेकल इत्यादींची उपकरणे वापरण्यात आली आहेत. तसेच टीसीएस, कॉन्ग्नीझंट आणि विप्रो अशा सेवा प्रदाता कंपन्यांकडून सेवा घेतली जात आहे.

‘एनएसई’ ही कामाच्या आकारमानानुसार जगातील सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज कंपनी असून, अत्यंत मोठ्या प्रमाणातील डेरीव्हेटिव्ह समर्थपणे हाताळण्याचा त्या कंपनीचा अनुभव आहे. अगदी गेल्या वर्षी कोविड महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही एनएसई ने ट्रेडिंग मध्ये कुठलीही अडचण येऊ न देता,व्यवस्थितपणे एक्स्चेंज केले होते.

समभाग आणि समभाग डेरीव्हेटिव्ह विभागाचे दररोजचे सरासरी काम २०१९ च्या तुलनेत अनुक्रमे १२२ टक्क्यांनी आणि ७९ टक्क्यांनी वाढले आहे. दररोजच्या ऑर्डर मेसेजेसची संख्या, प्रत्येक विभागात २०० टक्क्यांची वाढ झाली असून एका दिवशी ६.५ अब्ज ऑर्डर मेसेजेस आल्याचा विक्रमही नोंदण्यात आला आहे. त्याशिवाय, एनएसई आणि एनएसई क्लीयारिंग यांनी गेल्या दोन वर्षात,अंतर्गत-कार्यान्वयनसारखे बहुविध संरचनात्मक बदल अगदी विनासायास पद्धतीने केले आहेत.

अभिप्राय द्या!