MTAR Techonologies या हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ३ मार्च रोजी खुली होणार असून ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल.

आयपीओसाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअरसाठी ५७४ रुपये ते ५७५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराला किमान २६ शेअरसाठी बोली लावता येईल. तसेच १३ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे. आयपीओत १२४ कोटीपर्यंत फ्रेश इश्यू आणि ४७३ कोटींचे ८,२२,२७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री (ऑफर ऑन सेल) करण्याची योजना आहे. १० मार्च रोजी शेअर वाटप होण्याची शक्यता आहे. तर १५ मार्चपासून गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर जमा होतील.

अभिप्राय द्या!